समृद्धी महामार्गवरील धुळीमुळे आणि वृक्षतोडीमुळे वाहनधारक त्रस्त
अकोला :–अकोला—पातूर–मालेगाव महामार्गावर समृद्धी महामार्गाचे काम झपाट्याने सुरू असून समृद्धी महामार्गावरील उडणाऱ्या धुळीमुळे आणि वाहतूक सुरू असताना मोठ्या प्रमाणात नियोजनशून्य वृक्षतोडीमुळे वाहनधारकांनानाहकचा त्रास सोसावा लागत असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत पातुर तालुक्यातून शेकडो हेक्टर शेती या समृद्धी महामार्गात गेली असून महामार्गाचे काम सुरू असताना मातीमिश्रित मुरूम टाकण्यात येत असल्याने धुळीचे लोट उडत आहेततर या धुळीचा फटका शेती पिकावर होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे एवढेच नाहीतर उडणारीधूळ डोळ्यात उडत असल्यामुळे वाहन धारक विचलित होत आहेत तर समृद्धी महामार्गाच्या रस्त्यावर टाकण्यात येत असलेल्या मुरूम मिश्रित माती याची दबाई करताना पाणी टाकण्याची आवश्यकता आहे मात्र पाणी टाकण्यात येत नसल्यामुळे वाहनधारकांना त्रास सोसावा लागतअसल्याचे नागरिक बोलून दाखवित आहेतपातुर अकोला –पातुर –मालेगाव मार्गावरून परप्रांतीय जड वाहनांची वर्दळ सुरू असते वाहतूक सुरू असताना या मार्गावरील भव्य असे निंबाचे वृक्ष नियोजनशून्य पद्धतीने तोडले जात असल्यामुळे वाहनधारकांना आपले वाहन थांबवावे लागत आहे तर वाहतुकीमध्ये अडथळा सुद्धा निर्माण होत आहे सदर निंबाची झाडे तोडणारे ठेकेदार वाहतुकीबाबत कसलीही पर्वा करत नसून बेपर्वाईने झाडे तोडत आहेत त्यामुळे समृद्धी महामार्गावरील उडणारे मातीच्या धुळीचे लोट आणि भव्य झाडाची वृक्षतोड रस्त्यावरच केली जात असल्याने वाहनधारकांमध्ये अपघात घडण्याची भीती व्यक्त होत आहे मागील एका महिन्यामध्ये अपघातांमध्ये दहा ते पंधरा जणांचा मृत्यू झाला असून या अपघातात मागे समृद्धी महामार्गावरील नियोजन शून्य वृक्षतोड आणि रस्त्यावरील उडणारे धुळीचे लोट कारणीभूत असल्याची नागरिक खंत व्यक्त करीत आहेत सदर महामार्गावर समृद्धी महामार्गाचे व्यवस्थापक ठेकेदार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून उडणारे माती धुळीचे लोट थांबवण्यासाठी भरपूर पाणी मारून दबाई करण्याची आवश्यकता आहे तसेच वाहतुकीची वर्दळ सुरू असताना वृक्षतोडीबाबत वाहतुकीचे भान ठेवण्यासाठी ठेकेदार आणि व्यवस्थापक यांनी पाहणी करून नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे जेणेकरून समृद्धी मार्गाचे काम थांबणार नाही अशी मागणी होत आहे