बच्चूभाऊ! एखादा ‘स्टंट’ लोकांना वाचविण्यासाठीही कराल का?

0
409

पत्रकार उमेश अलोणे यांचा फेसबूकद्वारे पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांना सवाल

प्रिय बच्चूभाऊ!,
सप्रेम जय महाराष्ट्र!!..

भाऊ!, तूमच्याकडे ‘पालकत्व’ असलेल्या अकोल्याच्या जिल्हा रूग्णालयात आज गजानन देशमुख नावाचा रूग्ण त्याला व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने मरण पावला. तब्बल २४ तास त्यांच्या नातेवाईक अन मित्रांचा तूमच्या व्यवस्थेसोबत ‘व्हेंटीलेटर’साठी संघर्ष सुरू होता. मात्र, आपल्या नेतृत्वात काम करणारं प्रशासन, आरोग्य यंत्रणाच सध्या ‘व्हेंटीलेटर’वर असल्यानं गजानन देशमुखांच्या कुटूंबावर अकाली अनाथपणाचं दु:ख लादलं गेलं.

बच्चूभाऊ!, गजानन देशमुख हे ब?्यापैकी आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटूंबातले. त्यांनी याआधी शहरातील ‘आयकॉन’ आणि ‘ओझोन’ या बड्या रूग्णालयातही ‘बेड’ मिळविण्यासाठी हरत?्हेनं प्रयत्न केलेत. त्यांना ‘बेड’ मिळू शकला नाही. त्यांना शेवटी कसाबसा तूमच्या सरकारी दवाखान्यात प्रवेश मिळाला. त्यांची प्रकृती काल दुपारपासून खालावत गेल्यानं त्यांना आयसीयुत ठेवलं गेलं. परंतू, तूमच्या आयसीयुत त्यांच्यासाठी व्हेंटीलेटरच नव्हतं. आज व्हेंटीलेटरच्या संघर्षात जगण्याची आशा सोडलेल्या गजानन यांचा मृत्यू झाला.

कोरोना संकटाला सुरूवात होऊन जवळपास सहा महिने होतायेत. तूमच्या आरोग्यव्यवस्थेमध्ये पुरेशी साधनं नसणं हे अपयश कुणाचं?. गजानन यांच्याकडे पैसा होता. ती खर्च करण्याची तयारी होती. परंतू, तूमच्याकडे बेड नव्हते. बेड मिळाला तर व्हेंटीलेटर नव्हतं. बच्चूभाऊ!, गजाननचं मारेकरी कोण हो?… सांगा ना खरंच, बच्चूभाऊ!!!… ६ जूनला तूमच्याच जिल्हा रूग्णालयात वंदना कांबळे या महिलेचा तिला ‘बेड’ आणि ‘आॅक्सिजन’ न मिळाल्याने मृत्यू झाला होता. अडीच महिन्यात परिस्थितीत बदल न होता ती आणखी बिघडावी का?…

अडीच महिन्यांपूवीर्पेक्षा कोरोनाचा फास घट्ट आवळला गेलाय. रूग्णही वाढलेत याचीही जाणीव सर्वांनाच आहे. मग या परिस्थितीत आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी खरंच प्रयत्न केले गेलेत का?, हा प्रश्न उरतो आहेय.. वंदना कांबळे ही परिस्थितीनं अतिशय गरिब अशा परिवारातील. तर गजानन देशमुख आर्थिक परिस्थिती बरी असलेल्या मध्यमवर्गीय कुटूंबातील. तूमच्या सध्याच्या व्यवस्थेत कुणीच सुरक्षित नाही. ना श्रीमंत, ना मध्यमवर्गीय, ना गरिब… गरिबांनी तर कोरोना झाला तर जगण्याचीच आशा सोडावी अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यांच्यात आत्मविश्वास कोण जागवणार?… त्यांना जगण्याचा विश्वास कोण देणार?….

भाऊ!, तूमच्यात महाराष्ट्रातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, अपंग बांधव ‘आपला माणूस’ शोधत असतात.. तुमच्यात ‘नायक’ शोधणारे सारखं देवाकडे साकडं घालत आहेत.. तूमच्या प्रगतीसाठी अन भल्यासाठी…आजही तूम्ही मंत्रीपदाची शपथ घेतलेला ३० डिसेंबरचा दिवस आठवतो… तुम्ही जेंव्हा विधीमंडळाच्या प्रांगणात घातलेल्या ‘त्या’ मंडपातील ‘डायस’कडे शपथ घेण्यासाठी निघालात. त्यावेळी महाराष्ट्रातील तूमच्यावर प्रेम करणारा मनातून शहारून गेला. त्याच्या आनंदाला भरतं आलं. माज्याच घरातला माझा मुलगा, माझा भाऊ मंत्री होतोय असं प्रत्येकाला वाटत होतं. मंत्री झाल्यावर तूम्हाला अकोला जिल्ह्याचं ‘पालकत्व’ दिलं गेलं. तूम्ही ‘पालकमंत्री’ झालात. अनेकांना तूमच्यात अनिल कपूरसारखा ‘नायक’ दिसत होता. कारण, तूमच्यासारख्या हक्काच्या माणसाकडे आपलं ‘पालकत्व’ गेल्यानं सर्वसामान्य आनंदात होता. मात्र, या ‘पालकत्वा’ची खरी कसोटी असतांना तुमच्यातला जूना ‘बच्चूभाऊ’ अलिकडे हरवल्यासारखा वाटतो. आमच्याकडून हिरावल्यासारखा वाटतो.

तूम्ही पालकमंत्री म्हणून आतापर्यंत अनेक बैठकी घेतल्यात. मात्र, बैठकीनंतर तूम्ही गावाकडे गेले की ‘पुढचं पाठ अन मागे सपाट’ अशी परिस्थिती आहे. तूमच्या बैठकीचे ‘रिझल्ट’ आणखीही प्रत्यक्षात पहायला मिळालेले नाही. भाऊ, तूम्ही मुंबईत भांडून येथील ‘मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ तात्पुरतं सुरू करू शकला असता. मुजोर झालेल्या खाजगी दवाखान्यांना चाप लावू शकला असता. कोरोनाच्या नावाखाली दवाखाने बंद करणार्या डॉक्टरांना बिळाबाहेर काढू शकला असता. ढिम्म झालेल्या सरकारी बाबूंना वठणीवरही आणू शकला असता. मात्र, दुदैर्वानं हे सारं होत नाही. कारण, संवेदनशील कार्यकर्ता असलेला बच्चूभाऊ आता सत्तेतला मंत्री झाला आहे. तुमच्यातल्या मंत्र्यानं तुमच्यातील कार्यकर्त्यांवर मात तर केली नाही ना?, असा प्रश्न आता हतबल अकोलेकरांना सतावतो आहे. सारी व्यवस्थाच ‘क्वारंटाइन’ झाली की काय?, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावतोय.

भाऊ!, तूम्ही १६ मे रोजी अकोल्यात एक ‘स्टिंग आॅपरेशन’ केलं होतं बैदपुरा भागात. पोलीस लोकांना कंटेन्मेंट भागात सोडतात का?, हे पाहण्यासाठी तूम्ही काहीसं वेषांतर करीत हे स्टींग आॅपरेशन केलं होतं. तूमच्या परिक्षेत पोलीस पास झाले होते. भाऊ!, मग आताही करा नं असं स्टींग आॅपरेशन आपल्या आरोग्य व्यवस्थेचं अन यंत्रणेचं. एखादी चक्कर वेषांतर करून जिल्हा रुग्णालयातही मारा. पैसे लुटणार्या खाजगी दवाखान्यात ही जा ना कधी तरी वेषांतर करून. भाऊ!, तूमच्या आॅपरेशननं व्यवस्था सुधारली तर लोक खरंच मनातून. ‘दुवा’ देतील तूम्हाला.

४ जूनला राजनापूर खिनखिनीला जशी शेतात पेरणी केली होती, तशीच तूमच्या दरायार्ची पेरणी एकदा प्रशासनात ही करा. प्रशासनाचे कासरे हातात धरून सर्वसामान्यांच्या आयुष्यात विश्वास अन आनंदाची सुगी येऊ द्या. भाऊ!, एकदा ही पेरणीही कराच अकोल्यात. तुम्ही ही पेरणी केली तर व्हेंटिलेटर अन आॅक्सिजसाठी कोणता गजानन देशमुख अन वंदना कांबळेला मरावं लागणार नाही. ४ सप्टेंबरला अकोल्यात येतांना तूम्ही अपघात झालेल्या एका रूग्णाला स्वत: दयार्पूरला स्वत:च्या सरकारी गाडीतून नेलं. तुमच्यात त्या वाचलेल्या माणसाला ‘देवदूत’ दिसला. कोरोनाच्या संकटात बेड न मिळणारे, आॅक्सिजन, व्हेंटिलेटर न मिळणारे अनेक रूग्ण तुमच्यात तो ‘देवदूत’ शोधू पाहतायेत. भाऊ!, खरंच घडू द्याल का एकदा या लोकांना तुमच्यातील ‘देवदुता’चं ‘विराट’ दर्शन?…

भाऊ!, तूम्ही मंत्रीपदाचा ‘तामझाम’ सोडून सर्वसामान्यांना वेळ द्याल अशी अकोलेकरांना अपेक्षा आहे. तूमच्या दौर्यात तूमच्याभोवती असलेले खुशमस्करे, चापलूस यांच्या गदीर्तून, चौकडीतून थोडे बाहेर या. सर्व गोड-गोड सांगणार्या कार्यकर्त्यांपेक्षा सर्वसामान्य माणसाकडून ‘रियालिटी चेक’ करा. अन हो तुमच्यापेक्षा स्वत:ला फार मोठं समजणार्या अन सर्वसामान्यांना तुमच्यापर्यंत येऊ न देणार्या काही तथाकथित ‘पीए’नांही आवरा. अन वेळ मिळाला तर कधी सर्वसामान्यांचे फोनही उचलाल, ही माफक अपेक्षा.

अलिकडच्या कोरोनाच्या काळात परिस्थिती आणि नियतीचे अनेक भयावह चित्र हे माणूस आणि पत्रकार म्हणून प्रचंड अस्वस्थ करणारी आहे. ती माणूस म्हणून, कुणाचा मुलगा, कुणाचा पती, लेकरांचा बाप म्हणून आतल्या आत कुरतडणारी आहे. या काळात तरी आपण माणुसकी, संवेदनेची क्षितीजं मोठी करूयात. कोरोनाच्या वाळवंटात आटलेली माणुसपणाची, माणुसकीची हिरवळ तूमच्या सारखी माणसं सर्वाथार्नं फुलवू शकतात. त्यामूळे सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावना मोकळेपणानं या जाहीर पत्रातून मांडल्यात.

भाऊ!, तूमच्या कर्तृत्वावर, संवेदनेवर, तूमच्या सर्वसामान्यांशी असलेल्या बांधिलकी वर प्रचंड विश्वास आहेय. तूमच्या समाजकारणाचा-राजकारणाचा पाया हा रुग्णसेवा, रक्तदानासारख्या उदात्त हेतूंनी घातला गेलेला आहे. त्यामुळे तुमच्याकडून येथील सर्वसामान्यांच्या अपेक्षा इतरांपेक्षा अधिकच आहेत. कारण, तूम्ही मंत्री आता बनलेत. पुढे असाल किंवा नसालही. परंतू, तूम्ही सर्वसामान्यांसाठी सदैव ‘जानदार’ अन ‘नामदार’ आहात. अलिकडे तूमच्या व्यापामुळे हा संवाद काहीसा कमी होत असल्यानं हा जाहीर पत्रप्रपंच. तूम्ही या बाबी सकारात्मकपणे घेत निश्चितच परिस्थितीत बदल घडवून आणला हा पक्का विश्वास आहेय. तूमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयहयात शुभेच्छा!

उमेश अलोणे,
अकोला

Previous articleबुलडाण्यात आज 112 कोरोना पॉझिटिव्ह
Next articleपळशी बु. येथे युवकाचा मृतदेह आढळला!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here