Home मूल अनुभवलेल्या कथा हया अधिक सकस असतात: चंद्रशेखर पांडे गुरुजी
युवा साहित्यीक अमोल गोंडचवर यांच्या
पौर्णिमेची चंद्रकोरचे थाटात प्रकाशन संपन्न
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: अनुभवलेल्या कथा हया अधिक सकस असतात असे मत चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी अमोल गोंडचवर यांच्या पौर्णिमेची चंद्रकोर या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळ्यात केले.
अकोला येथिल सुप्रसिद्ध लेखक, ग्रामीण कथाकार तथा होतकरू शिक्षक अमोल गोंडचवर यांच्या पौर्णिमेची चंद्रकोर या कथासंग्रहाचे प्रकाशन दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ रविवार रोजी कृषीजागर सभागृह, शेतकरी सदन, डॉ.पं.दे.कृ.विद्यापीठ अकोला संपन्न झाले. सदर कथासंग्रह अथर्व पब्लिकेशन,जळगाव यांनी प्रकाशित केला आहे. पौर्णिमेची चंद्रकोरला समर्पक मुखपृष्ठ वाशीम येथिल नामांकित चित्रकार रा.मु.पगार यांनी दिले आहे.
यातील बहुतांश कथा ग्रामीण जीवनावर,तिथल्या दारिद्रय, गरिबी व व्यवस्थेबद्दल असलेली चीड यावर आधारित आहेत. सदर प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षपद जेष्ठ साहित्यिका प्रतिमा इंगोले यांनी भुषविले. कथासंग्रहाचे प्रकाशन श्री.चंद्रशेखर पांडे (गुरुजी) सभापती, बांधकाम व शिक्षण, जिल्हा परिषद अकोला म्हणून उपस्थित होते. संपादक पुरुषोत्तम आवारे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश पाचकवडे, तुळशीराम बोबडे, बापुराव झटाले, प्रा.मधुकर वडोदे, प्रा.मोहन काळे, प्रा.राजेश्वर बुंदेले या प्रमुख अतिथींसवे परिसरातील बहुतांशी साहित्यिक मंडळी सोहळ्याला उपस्थित होती.
यावेळी कथालेखक अमोल गोंडचवर यांनी पुस्तकाच्या प्रवासाबद्दल माहिती दिली.चंद्रशेखर पांडे गुरुजी पुढे असे म्हणाले की अमोल गोंडचवर हे ग्रामीण भागातील शिक्षक असल्याने त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव सातत्याने येत असतात त्यातूनच त्यांच्या अनेक कथा निर्माण झालेल्या आहेत.याप्रसंगी संपादक पुरुषोत्तम आवारे,ज्येष्ठ साहित्यिक सुरेश पाचकवडे, तुळशीराम बोबडे,बापुराव झटाले,प्रा.मोहन काळे प्रा.राजेश्वर बुंदेले यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
डॉ प्रतिमा इंगोले आपल्या अध्यक्षीय भाषणात अशा म्हणाल्या की,आजीनेचं कथा जिवंत ठेवलेली आहे. प्रत्येक जण हा लहानपणी आपल्या आजीच्या मांडीवरून कथा ऐकत असतो. त्यामुळे मला मी आजीच्या भूमिकेत असल्याचा भास होत आहे. यावेळी त्यांनी आपल्या गावातील काही ग्रामीण कथा व किस्से थोडक्यात स्पष्ट केले. सदर प्रकाशन सोहळ्याचे सुत्रसंचालन गोपाल मापारी प्रास्ताविक प्रज्ञा सरोदे व आभार प्रदर्शन मनोज लेखणार यांनी केले.
कथासंग्रह ई साईटवरही उपलब्ध
अमोल गोंडचवर यांच्या १४ कथा असलेल्या पौर्णिमेची चंद्रकोर हा कथासंग्रह अमँझॉन,बुकगंगा इ.साईटवर उपलब्ध आहे. अमोल गोंडचवर हे उत्तम कथालेखक,कवी, गझलकार आहेत. अमोल गोंडचवर यांचे साहित्यिक वर्तुळासह परिसरातून अभिनंदन होत आहे.
© All Rights Reserved