रेल रोखो आंदोलनाच्या भितीने स्वाभीमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना अटक

0
317

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

संग्रामपूर : शेतकरी विरोधी कृषी विधेयक रद्द करा ह्या मागणीसाठी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे समन्वयक  खा.राजु शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ६ फेब्रुवारी रोजी राज्यभर पुकारलेल्या आंदोलनाच्या पावित्र्यात असतांना स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना बोडखा येथुन रात्री १२:३० वाजता पोलिसांनकडुन अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार प्रशांत डिक्कर सह कार्यकर्ते शेगाव येथे रेल्वे रोखो आंदोलन करणार असल्याची पोलिसांना चुनूक लागताच संग्रामपुर पोलिस स्टेशनचे ठाणेदार भुषण गावंडे, पि. एस. आय.श्रीकांत विखे, पो.का‌‌. प्रमोद मुळे,अमोल बोदडे,खुपिया विभागाचे शैलेश बहादुरकर सह पोलिसांचा ताफा रात्री १२:३० वाजता प्रशांत डिक्कर यांच्या घराला घेराव घालून त्यांना अटक करण्यात आली आहे. ह्या आंदोलनाच्या धसक्याने  शेगाव शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. दिल्ली येथील ७० दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे  स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

Previous articleवन्यजीव अभयारण्यात आग
Next articleआमदारपुत्राला राज्यातील दुसऱ्या शिवतीर्थाचा सन्मान !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here