बुलडाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी..

0
540

▪️ आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांची घोषणा
▪️ पालकमंत्री ना. डॉ. शिंगणे यांच्या प्रयत्नांना यश
वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतिक्षेत असलेल्या जिल्हावासीयांची प्रतीक्षा आता संपली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीच्या फाईलवर आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी सही केली असून जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.


जालना, बुलडाणा, व परभणी जिल्ह्यांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीच्या स्वाक्षऱ्या झाल्या असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. पुढे बोलतांना ते म्हणाले की- मी मंत्री झाल्यानंतर उस्मानाबाद, रायगड, सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास प्रत्यक्ष मान्यता दिली आहे. उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. उस्मानाबाद, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या वर्षापासून सुरू होतील.
हिंगोली, गडचिरोली जिल्हेही महाविद्यालय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत,मात्र अशा जिल्ह्यांना थोडे थांबावे लागेल.कारण एका ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय उभारायचे झाल्यास सुमारे सातशे कोटी रुपये खर्च करावे लागतात. अर्थसंकल्पात एवढी आर्थिक तरतूद करणे शक्य नाही. त्यामुळे जवळ वैद्यकीय महाविद्यालय आहे, अशा जिल्ह्यांनी थोडे थांबावे, जिल्हा रुग्णालयांत अधिक सुविधा द्याव्यात, असा विचार सुरू आहे. मात्र, यासंदर्भात नेमका काय निर्णय घ्यायचा, मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव कधी ठेवायचे आदींवर चर्चेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. त्यानंतर राज्यात किती नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करावीत, याचा धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असेही ना.टोपे म्हणाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचे पालकमंत्र्यांनी मानले आभार!
बुलडाणा जिल्ह्यातील जनतेला आरोग्याची चांगली सुविधा मिळावी आणि येथील विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच वैद्यकीय शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी जिल्हावासीयांची मागणी होती. हीच बाब हेरून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणेसाहेब यांनी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरात मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून जिल्ह्यात शासकीय महाविद्यालयास मंजुरात मिळली आहे. त्याबद्दल पालकमंत्री ना. डॉ. शिंगणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचे आभार मानले आहे.

Previous articleसेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी दरोडा
Next articleजलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी घेतला प्रकल्पांचा आढावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here