व-हाड दूत न्युज नेटवर्क
मेहकर: येथे सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी धाडसी दरोडा झाल्याची घटना 5 फेब्रुवारीरोजी रात्री घडली. शनिवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास कृषी वैभव लॉनच्या पाठीमागे, बालाजी नगर मध्ये सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव राठोड यांच्या घरी दरोडा पडला. एकूण 5 जणांनी घर फोडून आत प्रवेश केला आणि राठोड दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी देत नगदी व दागिने लुटले. (गुड इव्हिनिंग )बुलडाणा एलसीबीची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.