वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
खामगाव- शेगाव तालुक्यातील जलंब येथील पीएसआयला पंधरा हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने रंगेहाथ पकडल्याची घटना 29 जानेवारी रोजी सायंकाळी घडली.
खामगाव तालुक्यातील कॉल खेड येथील 49 वर्षीय फिर्यादी ने जलम पोस्टेचे एस आय राजेंद्र हरिभाऊ देशमुख वय 51 यांच्याविरुद्ध बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चोरीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी मिळविण्यासाठी सहकार्य म्हणून पंधरा हजाराची लाचेची मागणी केल्याची तक्रार केली होती. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 29 जानेवारी रोजी जलंब पोलीस स्टेशन परिसरात सापळा रचून पोलीस स्टेशन समोरील चहाच्या दुकानावर एएसआय देशमुख यांना तक्रार दाराकडून पंधरा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. सदर कारवाई एलसीबी चे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी एसएस मेमाणे, संतोष दहीहांडे, पोका श्रीकृष्ण पळसपगार पोना इमरान आली यांनी केली वृत्त लिहीपर्यंत कार्यवाही सुरू होती.