अकोला: तीन हजार रुपयाची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंता सह पत्रकार विरुद्ध लाचलुचपत विभागाच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे.
माळशेलु शिवारात रोहित्राचे केलेले काम नियमबाह्य असल्याचे सांगून संबंधित ग्राहकाला मिटर देण्यासाठी व कामासंबंधी बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध न करण्यासाठी वीज वितरण कंपनीचे पिंजर येथील सहाय्यक अभियंता संदीप घोडे व पत्रकार सुनील अवचार यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली. या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर 31 डिसेंबर रोजी सापळा रचण्यात आला यामध्ये महावितरणच्या अभियंत्याने पत्रकारांच्या साह्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सहाय्यक अभियंता संदीप घोडे व पत्रकार सुनील अवचार यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.