वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: सिनिअर रेडिओलॉजिस्ट डॉ विजय राठोड सर यांचे बुधवारी रात्री दुःखद निधन झाले.
राठोड सर .. म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व
बेटी बचाओ कार्यक्रमात त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. अकोला चे जिल्हाधिकारी परिमल सिंह असताना ते रेडिओलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष होते.
त्यावेळी नियमबाह्य गर्भपात व सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टर विरुद्ध आम्ही मोहीम उभारली होती. तेव्हा अध्यक्ष या नात्याने त्यांनी कधीच शासकीय कामात हस्तक्षेप केला नाही किंवा एकही डॉक्टरला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. कायद्या पुढे कोणीही मोठा नाही, गुन्हा केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे या भूमिकेचे होते.