खामगावातील 97 ग्राम पंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

0
377

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

खामगाव :तालुक्यातील 97 ग्राम पंचायतीच्या 2021-25 करीता सरपंचपदाचे आरक्षण 27 जानेवारी रोजी महात्मा गांधी सभागृहामध्ये जाहीर करण्यात आले. यामध्ये अनुसुचित जाती करीता आरक्षित ग्राम पंचायतमध्ये किन्ही महादेव, आवार, रामनगर, पिंप्री गवळी, शेलोडी, राहुड, टेंभुर्णा, सुजातपूर, खोलखेड, विहिगाव, रोहणा, दिवठाणा, पिंप्री देशमुख, कंचनपूर, पातोंडा, बोरजवळा, पिंप्राळा, अडगाव, उमरा अटाळी, पारखेड, शिराळा या ग्राम पंचायतींचा समावेश आहे. तर अनुसुचित जमाती करीता दधम, जळका भडंग, निमकवळा, गवंढळा ह्या आरक्षीत आहेत. तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गाकरीता खामगाव ग्रामीण मधील कोलोरी, पोरज, लोणी गुरव, झोडगा, टाकळी, जयरामगड, लांजूंड, हिवरा खुर्द, शहापूर, आसा, घानेगाव, हिवरखेड, बोथाकाजी, बोरी, निपाणा, शिरजगाव देशमुख, वझर, सुटाळा खुर्द, नागपूर, हिंगणा कारेगाव, सुटाळा बु., ज्ञानगंगापूर, गोंधनापूर, गणेशपूर, अटाळी आणि सर्वसाधारण सरपंच पदाच्या जागेकरीता  अंत्रज, अंबिकापूर, आंबेटाकळी, भंडारी, भालेगाव, चितोडा, चिंचपूर, ढोरपगाव, घाटपुरी, गारडगाव, घारोड, जनुना, जळका तेली, कोंटी, कुंबेफळ, कदमापूर, काळेगाव, कवडगाव, कंझारा, खुटपुरी, लोखंडा, लाखनवाडा खु., माटरगाव, मांडका, माक्ता, नांद्री, नायदेवी, निरोड, निळेगाव, पिंप्री कोरडे, पळशी बु., पाळा, संभापूर, शिर्ला नेमाने, सजनपूरी, वर्णा, वाडी, वडजी, जयपूर लांडे, लाखनवाडा बु., हिवरा, काळेगाव बु.,पळशी खु., पिंपळगाव राजा, वाकूड, पिंप्री धनगर, या ग्राम पंचायतींचा समावेश आहे. आरक्षण सोडतीसाठी तहसीलदार शितल रसाळ, नायब तहसीलदार बोबडे, निवडणूक विभागाचे अधिकारी बटवे व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
29 जानेवारी रोजी होणार महिला आरक्षण जाहीर
तालुक्यातील 97 ग्राम पंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले असून यापैकी 50 टक्के महिलांचे आरक्षण 29 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाहीर होणार आहे. आता कोणत्या ग्राम पंचायतीवर महिला कारभारींची निवड होणार आणि कोणत्या ग्राम पंचायतीचा कारभार पुरूषांच्या हाती जाणार याकडे इच्छुक सरपंचांचे लक्ष लागले आहे. अनेक ग्राम पंचायतीमध्ये उमेदवार सरपंचपदाकरीता गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. मात्र सरपंचपदाचे चित्र महिला सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होणार आहे.

Previous articleअकोल्यात ‘बर्ड फ्लू’ची ‘एन्ट्री’! – पिंपळगाव चांभारे येथील पोल्ट्री फार्म परिसर प्रतिबंध क्षेत्र घोषित
Next articleसिनिअर रेडिओलॉजिस्ट डॉ. विजय राठोड यांचे निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here