वाहनातून खुलेआम नेले जातेय गौण खनिज; कायद्याबाबत एसडीओ अभयसिंह मोहिते अनभिज्ञ

0
536

उमेश साखरे
वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क 
मूर्तिजापूर: तालुक्यामध्ये गौण खनिज वाहून नेताना नियमांची पायमल्ली केली जात आहे. या सर्व प्रकाराकडे महसूल विभागाचे सपशेल दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे गौण खनिज वाहतूक करताना वाहन आच्छादित (झाकून) करुन नेणे बंधनकारक आहे. आश्चर्याची बाब ही की, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते हे कायद्याबाबतच अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. त्यामुळे ते काय कारवाई करतील असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मूर्तिजापूर तालुक्यातून मोठया प्रमाणात गौण खनिज वाहतूक सुरू असते. रेती, मुरुम वाहून नेताना ती व्यवस्थित झाकून नेण्यात नसल्याने लोकांना त्रास होतो. गौण खनिज उडाल्याने डोळ्यात जळजळ होते तसेच वाहनातून खनिज रस्त्यात पडल्याने अपघात घडतात. या बाबत प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. या गोष्टींना त्वरित आळा बसावा तसेच संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. येथून तालुक्यातच नाहीतर दर्यापूर, अंजनगाव, कारंजा, कामरगांव इथपर्यंत गौण खनिज वाहतूक होते. मात्र, वाहन झाकलेले नसते. महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने खुलेआम वाहतूक सुरू आहे. यामुळे अपघात होऊन काहींना प्राण गमवावा लागला. तसेच काहींना अंपगत्व आले. संबंधिताकडे तक्रारी करुनही काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे टिप्पर वाहनचालक, मालकांना धाक राहिला नाही, असा आरोप होत आहे.
जीआर काय म्हणतो
गौण खनिज वाहतूक करताना वाहन आच्छादित (झाकून) करुन नेणे बंधनकारक आहे. शासन निर्णय क्रमाक : गौखनि – 10/0219/प्र. क्र 9 /ख-1 दिनाक 03/09/2019.          शासन निर्णय क्रमांक : गौखनि -10/0512/प्र क्र 300 / ख दिनांक 12/मार्च 2013. या शासन निर्णयाचा अवलंब करणे आवश्यक आहे. याविषयी अनभिज्ञता धोक्याची ठरू शकते.
गौण खनिज वाहून नेताना बंधन नाही
गौण खनिज वाहतूक करताना वाहनांना झाकून नेण्याचे कुठलेही बंधन नाही, शासनाचा निर्णय पाहण्यात आला नाही. तरीही चौकशी करतो व तहसीलदारांना कळवतो.  – अभयसिंह मोहिते, उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर

Previous articleनिकोप लोकशाही राखणे प्रत्येकाचीच जबाबदारी – जितेंद्र पापळकर
Next articleबुलडाण्यात बर्ड फ्लू ची एन्ट्री! पशुपालकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here