नवी उमेद!

0
848

गेल्या पाच महिन्यांपासून संपूर्ण जग एकाच गोष्टीभोवती फिरत आहे. ते म्हणजे कोरोना!
या जागतिक महामारीमुळे संपुर्ण जगच जणुकाही थांबले आहे. संकट कधी, कोणत्या रुपात येईल सांगता येत नाही. ‘कोरोना’ नावाचे संकट सर्वांच्या समोर उभे ठाकले असून या संकटाचा सामना करतांना सर्वांच्याच नाकीनऊ येत आहेत.
भारतात लॉकडाउन जाहिर झाले. आणि सामान्य जनतेचे जगणेच असह्य होवून गेले. कित्येक जण बेघर झाले तर कित्येकांचा रोजगार हिरावला गेला. कोरोना महामारीच्या भितीपोटी हातचे काम सोडून अनेकांचे स्थलांतर सुरु झाले. सुरुवातीच्या काळात स्थलांतरीत मजुरांच्या परतीची व्यवस्था नसल्याने अनेकांनी हजारो किलोमिटर पायी चालून आपले घर गाठले. काहींचा अपघाती मृत्यू झाला. तर गाव नजरेच्या टप्प्यात असूनही काहींना गावात प्रवेश मिळाला नाही. अनेकांनी नैराश्येतून, एकटेपणातून आत्महत्या केल्या आहेत. तर काही उपासमारीचे बळी ठरले आहेत.
या अशा अनेक नकारात्मक गोष्टी आजूबाजूला घडत असतांना काही सकारात्मक गोष्टी सुद्धा घडल्याचे दिसून आले. अनेकजण एकमेकांच्या मदतीला धावून आले. सरकारसोबतच सामाजिक संस्थांनी जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणासह गरजूंच्या जेवणाची व्यवस्था केली. या सर्व बाबीही तेवढ्याच महत्वपूर्ण ठरल्या.
म्हणतात ना.. भुतकाळ हा आपल्या पाठी राहिलेला असतो परंतू मागे वळून पहायचे अथवा नाही हे सर्वस्वी तुमच्या हाती असते. आता सगळीकडे अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक जण यातून सावरण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.
‘‘सोचने से कहॉ मिलता है, तमन्नाओ का शहर
          चलना भी जरुरी है, मंजिल को पाने के लिए …’’
परिस्थितीच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा नव्या उमेदीने नवी वाट शोधावी लागणार आहे.
‘‘कारण परिस्थिती कितीही कठिण असली तरी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, मार्ग निघणारच!’’
आम्ही सुद्धा असेच सकारात्मक विचार घेवून तुमच्यासमोर येत आहोत, डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ‘वºहाड दूत’ बनून …!

शेवटी एकच सांगावेसे वाटते,
‘‘अभी न पुछो मंजिल कहा हैं,
अभी तो हमने चलने का इरादा किया है,
ना हारे हैं, ना हारेंगे कभी.. ये खुदसे वादा किया है..’’

सौ. अर्चना योगेश फरपट
संपादक, वऱ्हाड दूत, अकोला.
Email. editor@varhaddoot.com

Previous articleचिन माईंडगेम खेळत आहे सय्यम ठेवणे गरजेचे आहे
Next articleपितृपक्ष ते प्रकाशपक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here