राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरने काळीपिवळीला उडवले, पतीपत्नीसह तिघे जागिच ठार

0
1428

मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क

खामगाव: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वडी गावाजवळ रविवारी संध्याकाळी ६.३० वाजता भरधाव भरधाव कंटेनरने काळीपिवळीला दिलेल्या धडकेत तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यामध्ये ९ प्रवासी काळीपिवळीतील जखमी झाले. नांदुर्‍यावरुन वडनेरकडे प्रवासी घेऊन जाणारि काळीपिवळी क्रमांक एम .एच.२६ बि.९३२९ राजस्थान मधील कंटेनर आर.जे.१० जि. ए. ७५९९ राष्ट्रीय महामार्गावरील वडि गावाजवळ जोरदार धडक देऊन काळीपिवळीला चिरडले.

यामध्ये काळीपिवळीतील तीन प्रवासी भगीरथाबाई विठ्ठल दळवी वय ५५ वर्ष रा. वडनेर व मूळचे वडनेर येथील व सध्या मुंबई येथे कार्यरत पती-पत्नी सुनिल सुभाष तायडे वय ४० व पत्नी अर्चना सुनील तायडे वय ३२ यांचा या अपघातात मृत्यू झाला . आशा पुंडलिक जंगले व जया अनंतराव जंगले दोन्ही राहणार काटि. रामचंद्र नथ्थू सातव वय ६२ , पुष्पा गजानन इंगळे वय ४४ , कमल दिनकर पांडे वय ६० , बेबाबाई राजाराम सातव वय ६१ राहणार वडनेर तर अपघातात मृत्यू झालेले पती -पत्नी यांची दोन्ही मुले श्रेया सुनील तायडे वय ७ वर्ष व रियांश सुनील तायडे वय ४ वर्ष तसेच तनिष्का रमेश होनाळे वय ४ वर्ष हे नऊ प्रवासी जखमी झाले आहेत .
अपघातातील मृतक

आेम साई फाउंडेशनची धाव 
अपघातातील जखमींना ओम साई फाउंडेशनचे विलास निंबोळकर,पत्रकार प्रवीण डवंगे, आनंद वावगे आदि यांनी प्रथम नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरीता भरती करण्यात आले यामधील काही जखमींना खामगाव येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया उशिरा रात्रीपर्यंत नांदुरा पोलिस स्टेशनमध्ये सुरू होती . या अपघातानंतर कंटेनरचालक जीवन नलबतसिंग मालवी वय ३२ वर्ष राहणार निपाणी खुर्द जिल्हा जिल्हा शाजापूर शहाजापूर मध्यप्रदेश याने घटनास्थळावरून पळ काढला होता . त्याला नांदुरा शहरातील खरेदी विक्री समोर पोलिस व नागरिकांनी पकडले .

Previous articleअकोला जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाला रक्त संक्रमण परिषदेचा दणका 
Next articleशिर्डीला दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या गाडीला अपघात, दोन ठार तर नऊ जन जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here