वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: येथील तेजस्वी हेल्थ केअर सेंटर एटीएस’च्या दहशतवादी पथकाने छापा मारून अवैध सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे दरम्यान हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अनेकांमध्ये धावपळ उडाली आहे विशेष म्हणजे तेजस्वी चे ग्राहक खामगावात असल्याची माहिती एका गोपनीय सूत्रांनी दिली आहे खामगावातील ग्राहकांच्या सांगण्यावरून याच डॉक्टरांनी खामगाव येथील उच्चभ्रू वस्तीत ही तेजस्वी ची एक शाखा उघडली होती विशेष म्हणजे जावंधिया कॉम्प्लेक्स या झेलम नाका स्थित परिसरात ही शाखा काही महिन्यांपूर्वीच उघडण्यात आली होती परंतु व्यवसायिक कारणाचा अनेक काही कारणांमुळे ती बंद करण्यात आली होती काल अकोला येथील तेजस्वी च्या मुख्य शाखेवर एटीएस पथकाने धाड टाकून एका महिलेला ताब्यात घेतले आहे त्यासोबतच डॉक्टर देशमुख यांनासुद्धा ताब्यात घेण्यात आले असून आता डॉक्टर देशमुख कडून तेजस्वी चे खामगाव कनेक्शन उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे सर्वत्र खळबळ माजणार असल्याचे दिसून येत आहे नेमके खामगावातील कोणते बडे मासे गळाला लागणार हे लवकरच समजणार आहे.