व-हाड दूत न्युज नेटवर्क
नांदुरा जि.बुलडाणा: तांडव बेव सिरीजवर बंदी घालून निर्माता, निर्देशक, लेखक, कलाकार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी बजरंग दल नांदुरा शहर व तालुका यांच्यावतीने तहसीलदारांमार्फत सरकारकडे करण्यात आली आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तांडव या वेब चित्रपटामध्ये हिंदू धर्माबद्दल दलित समाजाबद्दल अपमानजनक शब्दांचा वापर करण्यात आले. त्यामुळे
हिंदू धर्माच्या सोबतच दलित बांधवांच्या जातीय भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे सदरहू वेब सिरीज मध्ये दाखविण्यात आलेल्या वादग्रस्त दृश्य व विधानाबाबत मालिकेचा दिग्दर्शक अली अब्बास जफर, प्राईम इंडियाचे प्रमुख अर्पण पुरोहित, निर्माता हिमांशू मेहता, लेखक गौरव सोलंकी, अभिनेता सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील गोहर इत्यादींवर तत्काल गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी बजरंग दल नांदुरा यांच्या वतीने करण्यात येत आहे. याप्रकरणी संबधितांवर त्वरित गुन्हे दाखल न झाल्यास बजरंग दल नांदुरा व तालुका च्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल व व त्या वेळी होणारे सर्व परिणामाची जबाबदारी शासनाची राहील असा इशारा जिल्हा धर्म प्रचार व प्रसार प्रमुख सचिन मालगे, तालुका अध्यक्ष विश्व हिंदू परिषद भगवान तायडे, जिल्हा गोरक्षा प्रमुख गजानन डिवरे, गजानन कुराडे तालुका मंत्री वि. हि. प, शिवा साबे बजरंग दल तालुका संयोजक, सुशील कोल्हे बजरंग दल तालुका संयोजक, अमोल सुरोसे बजरंग दल शहर गोरक्षा प्रमुख, तानाजी वनारे आदींनी दिला आहे.