मालवाहूची टाटा-मॅजिकला धडक, २ ठार, ५ जखमी

0
452

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: शहरापासून काही अंतरावर कापशी-चिखलगाव दरम्यान मालवाहूने टाटा-मॅजिकला जबर धडक दिली. यामध्ये २ प्रवाशी जागिच ठार तर ५ जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजता घडली.
एमएच३७-५३८१ मालवाहू लाकूड साठा घेवून भरधाव जात होता. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणा-या एमचएच३० एल २९९६ या क्रमाकांच्या टाटा मॅजिकला मालवाहूने जबर धडक दिली. या अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमींमध्ये चिमुकलीचाही समावेश आहे. पातूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले असून जखमींना त्यांनी तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. दरम्यान आमदार नितीन देशमुख यांनीसुद्धा घटनास्थळी भेट दिली.

Previous articleग्रामपंचायत निवडणूकीत राडा; शिवसेनेचे दत्ताभाऊ पाटील जखमी
Next articleजिजाऊची लेक जयश्रीताई पुंडकर हाकत आहेत, तेल्हारा नगर परिषदेचा सक्षमपणे कारभार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here