भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांचा खळबळजनक खुलासा
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात भाजपच्या माजी आमदाराने पोलिसात धाव घेतली आहे. रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक सविस्त पत्र मुंबई पोलिसांना दिले आहे.
भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी याबाबत सांगितले की, ‘2010 पासून रेणू शर्मा मला त्रास देत होती. वेगवेगळया फोन नंबरवरुन ती माझ्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करत होती. तिला माझ्यासोबत संबंध प्रस्थापित करायते होते. ती मला हनी ट्रॅपच्या जाळयात अडकवण्याचा प्रयत्न करत होती. पण, मी तिला प्रत्येकवेळी टाळत होतो,’ असा आरोप कृष्णा हेगडे यांनी केला आहे. हेगडे पुढे म्हणाले की, ‘नकार देऊनही रेणू शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. त्यानंतर मला बाहेरून कळाले की, रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवले आङे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी’, असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले आहे.
धनंजय मुंडेवरील आरोप ऐकून धक्का बसला
धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माने केलेल्या आरोपांबद्दल हेगडे म्हणाले की, ‘अगदी जानेवारी 2021 पर्यंत ती माझ्या मागे लागली होती. आता, दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याविरोधात मीडियामध्ये केलेले आरोप वाचून मी थक्क झालो. त्याच वेळी मी रेणू शर्माबद्दल तुम्हाला सांगण्याचा निर्णय घेतला. आज त्यांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केले आहे, काही वर्षांपूर्वी त्या जागी मी असू शकलो असतो, उद्या दुसरे कोणी असेल’, असे हेगडेल म्हणाले.