वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: खरीप पणन हंगाम 2015-16 व 2016-17 मध्ये खरेदी करण्यात आलेल्या ज्वारी पैकी शासकीय गोदाम अकोला येथे 3398 क्विटंल शासकीय गोदाम अकोट एकूण 10857.70 क्विटंल व शासकीय गोदाम तेल्हारा येथे 1777.70 क्विटंल असे एकुण 10857.70 क्विटंल ज्वारी शिल्लक असलेल्या उक्त कालावधी मध्ये नियतन (ङिओ) प्राप्त न झाल्यामुळे ज्वारी विल्हेवाट विना पडुन होती. सदर ज्वारीला 3 ते 4 वर्षाचा कालावधी झाल्यामुळे ज्वारी हि संचालक ,सार्वजनिक आरोग्य सेवा प्रयोग शाळा पुणे व पशुसंवर्धनसह.आयुक्त, रोगअन्वेष,म.रा.औधं,पुणे प्रयोग शाळेला अकोला,अकोट व तेल्हारा या शासकीय तालुक्याची शिल्लक असलेली ज्वारीचे नमुने पाठविण्यात आले. एक महिण्यानी दोन्ही प्रयोग शाळेनी तिनही तालुक्याची ज्वारी हि मानवास तसेच पशुपक्षी खाण्यास अयोग असल्याचा तपासणी अहवाला या कार्यालयात सादर केला आहे.
प्रयोग शाळेनी दिलेल्या अहवाला नुसार सदर प्रस्ताव दिनांक 16नोव्हेंबर2018 पासुन ते 29 ऑक्टोंबर2020 पर्यंत प्रस्ताव शासनास सादर केला आहे. पंरतु शासना कडुन विल्हेवाट लावण्याची परवानंगी मिळाली नसल्याने सदर ज्वारी विकत घेण्या करिता 1.शारदा महिला औद्योगिक सह.संस्था,मर्यादित,अमरावती 2.विदर्भ मल्टीपरपज एज्युकेशन सोशल वेल्फेअर सो.सा.नांदुरा.3.भुमित्र पलचेस ॲन्ड बॉयटेक, मु.पो.सागवन,ता.जि. बुलढाणा या संस्थानी अर्ज या कार्यालयात सादर केले होते. सदर अर्ज शासनाकडे पाठविण्यात आले होते. शासनाचे पत्र दिनांक 4 मार्च 2020 चे या कार्यालयात प्राप्त झाले पत्रानुसार भरडधान्य (ज्वारी) नक्की कोणत्या संस्थेला ज्वारी खरेदी करण्याची मंजुरी दयावी या बाबत बोध होत नसल्यामुळे नियमोचीत स्वयस्पष्ट प्रस्ताव शासनास सादर करावा. असे या कार्यालयाला कळविण्यात आले होते. त्या प्रमाणे या कार्यालयानी तिनीही संस्था चालकांची सयुक्त बैठक दिनांक 12 मार्च 2020 रोजी जिल्हा पुरवठा कार्यालया अकोला येथे घेण्यात आली. सभे मध्ये सर्व संस्थाना सुचना देण्यात आल्या कि, आपले दरपत्रक शील बंद पाकीट मध्ये तयार करुन या कार्यालयात सादर करावे. ज्या संस्थेचे दर जास्तीस जास्त असतील त्या संस्थेचे नाव मंजुरी करीता शासनाकडे सादर करण्यात येईल. त्या प्रमाणे संस्थेनी आपले दर ठरवुन दरपत्रक या कार्यालयात सादर केले होते. सदर संस्थेनी दिलेल्या जास्तीचे दर शासनास सादर केले होते. शासनाचे पत्र दिनांक 1 डिसेंबर 2020 चे पत्रान्वेय ज्या संस्थानी जादाचे दर दिल्या प्रमाणे 1 शारदा महिला औद्योगिक सह.संस्था,मर्यादित,अमरावती यांना शासकीय गोदाम अकोला अकोला, 2.विदर्भ मल्टीपरपज एज्युकेशन सोशल वेल्फेअर सो.सा.नांदुरा. यांना शासकीय गोदाम अकोट व 3.भुमित्र पलचेस ॲन्ड बॉयटेक, मु.पो.सागवन,ता.जि. बुलढाणा या तिन्ही संस्थेनी तालुका निहायदेण्यात जादाचे दर दिल्यामुळे यांना शासनाने विक्री करण्यातस मान्यता देण्यात आली.शासनाचे पत्रानुसार या कार्यालयानी उपरोक्त संस्थेला आदेश दिनांक 17 डिसेंबर 2020 रोजी देण्यात आला आहे. सदर ज्वारीची विल्हेवाट शासनाने दिलेल्या मान्यता नुसार विक्री करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.