व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. यासाठी त्यांनी मोदींना पत्र लिहिलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.
मराठा आरक्षण कसं अबाधित राहिल. त्यासोबत एसईबीसीचे आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये, यासाठी केंद्राने भूमिका घ्यावी. देशभरातील राज्यांना जे आरक्षण दिले आहे, तेही अडचणीत येणार नाही, असेही यात म्हटलं आहे.
येत्या 25 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर इत्यादी नेते दिल्लीत आले आहेत. या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाने पवारांशी पाऊण तास चर्चा केली.