तुला न मला घाल कुत्र्याला! अकोल्यात सरकारी गोदामात ११ हजार क्विंटल ज्वारी सडून झाला भूसा

0
507

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: सरकारी यंत्रणेच्या कामातील अक्षम्य दुर्लक्षपणाचा एक संतापजनक प्रकार अकोल्यात समोर आलाय. सरकारी यंत्रणेच्या वेळकाढूपणामूळे सरकारनं खरेदी केलेल्या १०८४७ क्विंटल ज्वारीचा सडून अक्षरश: भूसा झालाय. जिल्ह्यातील शासकीय गोदामांमध्ये सडलेली ही ज्वारी पुरवठा विभागावर आता फक्त २२ रूपये क्विंटलनं विकण्याची नामुष्की आलीये. अकोल्यातील खदान भागातल्या सरकारी गोदामात ज्वारी सडून अक्षरश: भूसा झालेली आहे. हा नमूना आहेय सरकारी यंत्रणेच्या वेळकाढूपणा अन ‘चलता है’ वृत्तीचा….


साभार : ABP माझा (उमेश अलोणे, प्रतिनिधी, अकोला)
चार वर्षांपुर्वी अकोला जिल्ह्यात आधारभूत किंमत योजनेंतर्गत १४,९०४ क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आली होतीय. प्रति क्विंटल १५७० रूपये दराने ही ज्वारी खरेदी करण्यात आली होतीय. जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा येथील सरकारी गोदामांमध्ये ही ज्वारी साठवून ठेवण्यात आलीय. मात्र, गेल्या चार वर्षांत ही ज्वारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिका धारकांना ही ज्वारी दिलीच नाहीय. भारतीय अन्न महामंडळ अर्थात ‘एफसीआय’नं यासाठी परवानगीच दिली नसल्याचा आरोप अकोला पुरवठा विभागानं केलाय. अन आता
चार वर्षानंतर गोदामांतील या ज्वारीचा सडून अक्षरश: भुंगा झालाय. ज्वारीचा भूगा झाल्यावर आता मात्र प्रशासन जागं झालंय. या ज्वारीची विल्हेवाट लावण्यासाठी पुरवठा विभागाने सरकारला परवानगी मागितलीय. सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं या भूगा झालेल्या ज्वारीच्या विक्रीला परवानगी दिलीये. आता ही ज्वारी फक्त २२ रूपये क्विंटलने विक्री करण्याची नामुष्की प्रशासनावर आलीये. वेळीच पाऊले उचलली असती तर सार्वजनिक वितरण प्रणालीत गरिबांना ही ज्वारी १०० रूपये प्रति क्विंटल विकता आली असती. गोदामांमधील उर्वरित ज्वारीही सडलेल्या अवस्थेत असल्यानं त्याचे नमूने तपासणीसाठी पुण्याला तपासणीसाठी पाठवलेयेत. या संपूर्ण प्रकारांत दोषी यंत्रणेवर कठोर कारवाईची मागणी मनसेनं केलीये.

या केंद्रावर झाली ज्वारी खराब
केंद्र – खराब झालेली ज्वारी (क्विंटलमध्ये)
अकोला – ३३९८
अकोट – ५६८२
तेल्हारा – १७७०

सरकारचं झालेलं नुकसान
खराब ज्वारी – खरेदी किंमत – एकूण
१०८५७ – १५७०/क्वि. – १ कोटी ७० लाख ४५ हजार ४९०

खराब ज्वारी – विक्री किंमत – एकूण
१०८५७ – २२/क्वि. – २ लाख ३८ हजार ८५४

Previous articleउभ्या ट्रकला कार भिडली; एकाच कुटुंबातील तिघे ठार
Next articleमी पुन्हा येईल तुझ्या कुशीत…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here