कारंजा. तालुक्यातील ग्राम जांब ( कारंजा ) येथील 45 वर्षीय भूमीहीन इसमाने विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केली. ही घटना 9 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार ग्राम जांब ( कारंजा) येथील धनराज सोमला जाधव (वय 45) यांचा मृतदेह जांब शेतशिवारातील धरणालगत असलेल्या अमित वानखडे यांचे शेतातील विहिरीत आढळून आला. सदर मृतक हा गावातून बेपत्ता होता. 9 जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन धंदर यांनी तातडीने ऐ.पी.आय. गोलाम , मुरलीधर उगले , नितीन पाटील , भोयर पाटील व घुले यांना घटनास्थळी रवाना केले. उंबर्डा बाजार आरोग्य वधर्नी केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी एस .आर. नांदे तथा डाॅ.आडे यांनी घटनास्थळीच सदर मृतदेहाचे शवविच्छेदन केल्याने मृतदेहावर घटनास्थळीच अंत्यसंस्कार करण्यात आले.याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यू ची नोंद घेतली असुन मनमिळाऊ स्वभामुळे मृतक सर्वांच्या परिचयाचा होता .