व-हाड दूत न्युज नेटवर्क
शेगाव: रेल्वेत प्रवास करीत असतांना एका प्रवाशाचा सापडलेला मोबाईल त्याच डब्यातील एका दुस-या प्रवाशाने प्रामाणिकपणा दाखवत पोलिसांकडे सुपूर्द केला. रेल्वे पोलिसांनीही कर्तव्यदक्षता दाखवत तातडीने सदर मोबाईल संबधिताला परत करण्यात आला.
सविस्तर असे की, ८ जानेवारीरोजी सकाळी ट्रेन नं. ०१०३९ या ट्रेन वर पोशि/436 आशांत सोरते हे गस्त घालत होते. दरम्यान अनिल प्रकाशलाल जनानी हे त्यांचे जवळ आले. त्यांनी सॅमसंग कंपनीचा १२ हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल सापडल्याची माहिती दिली. कोच नं D-03 मधिल बाथरुम मध्ये हा मोबाईल राहुन गेला होता. त्या
अनुषंगाने अंमलदार पोशि/ 436 सोरते यांनी रेपोस्टे अकोला येथे याबाबत तत्काळ कळवले. मात्र त्यांनी गाडी निघुन गेल्याचे सागितले. त्यांनी मुर्तिजापुर येथे फोन करुन डयुटि वरिल कर्मचारी यांना तत्काळ माहिती दिली. मुर्तिजापुर येथिल पोशि योगेश राउत यांचेकडे हा मोबाईल जमा करण्यात आला. व संबधित मुलीच्या स्वाधिन करण्यात आला. ठाणेदार सपोनि सागर गोडे व पोउपनि पानपाटील यांचे मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.