वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
खामगाव :दुचाकीने जात असताना पतंगीचा मांजा आडवा आल्याने दुचाकीस्वाराच्या गळ्याला जखम झाल्याची घटना येथील शाळा क्रमांक 6 जवळ घडली. प्राप्त माहितीनुसार, मेन रोड स्थित व्यापारी राजू भाटे (54) हे दुकान बंद करून रात्री घराकडे जात असताना शाळा शाळेजवळ कटलेल्या पतंगाचा मांजा रस्त्यावर लटकलेला मांजा गळ्याला लागल्याने त्यांचा गळा चिरून ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.