अरे काय चाललंय महाराष्ट्रात! अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या

0
373

व-हाड दूत न्युज नेटवर्क
रायगड:
पेण तालुक्यात (Pen, Raigarh) एका अडीच वर्षांच्या चिमुरडीची बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या (Rape and Murder) केल्याची धक्कादायक तितकीच संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं पेण तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मानवतेला काळिमा फासणारी घटना पेण तालुक्यातील मळेघर वाडी येथे घडली आहे. अडीच वर्षांच्या आदिवासी मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
पेणच्या ग्रामीण रुग्णालयात तिचा मृतदेह विच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. पेण पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. त्याला आधीही बलात्कारप्रकरणी अटक झाली होती. सध्या तो जामिनावर असून त्यानेच हे संतापजनक कृत्य केल्याचे समजते. पेण पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे मळेघर वाडीसह परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
पुणे जिल्हयातही अशीच घृणास्पद घटना 
दरम्यान, पुणे जिल्ह्यात ही अशीच अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचे फोटो काढल्याच्या घटनेनं जुन्नर तालुका हादरला आहे. तांबे या पश्चिम पट्ट्यातील, आदिवासी समाजातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या कारणावरून तीन युवकांवर पॉस्को अर्थात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक आणि अनुचित जाती जमाती अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक नराधम फरार आहे.

Previous articleआरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8 हजार पदं भरणार
Next articleक्रिएटिव्हिटी अँड एक्सलुसिव्ह इनोव्हेशन अवॉर्डससाठी साताऱ्याचे बालाजी जाधव गुरुजींची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here