नववर्षाची पहाट झाली; स्वागत आहे
नवीन स्वप्ने दारी आली; स्वागत आहे
निळे- सावळे डोंगर धुक्यात हरवून गेले
हिरवी पाती दवात न्हाली; स्वागत आहे
प्रसन्नतेला सोबत घेवून वारा आला
सुवास उधळत फुले म्हणाली, स्वागत आहे..
क्षितिजाच्या पलीकडे भरारी घेण्यासाठी
ही जिद्दी पाखरे निघाली; स्वागत आहे
दुख: कालचे विसरून, अश्रु पुसून टाकू
जीवना, तुझे हस-या गाली स्वागत आहे ..
कवी: किशोर बळी, अकोला
मो.क्र. ९४२१६७७१८१