ग्रामपंचायत निवडणूक: एकूण 1 हजार 71 अर्ज दाखल!

0
303

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

अकोला: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गेल्या तीन दिवसांच्या काळात एकूण 1 हजार 71 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, आता अर्ज दाखल करण्यास केवळ दोन दिवसांचा कालावधी उरल्याने मंगळवारीही उमेदवारांची झुंबड उडाल्याचे पहावयास मिळाले.
जिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला असून, ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 23 पासून सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी 9 तर दुसऱ्या दिवशी 121 अर्ज तर सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी सायंकाळपर्यंत 941 अर्ज संबंधित तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले असून, काल सायंकाळपर्यंत एकूण 1 हजार 71 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. जिल्ह्यातील एप्रिल ते डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाल्याने निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आवश्यक कागदपत्रे जुळविण्यासाठी उमेदवारांचा चांगलाच कस लागत आहे. तीन दिवसांच्या शासकीय सुट्टीनंतर उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी केली असल्याचे दिसून आले.
दाखल नामनिर्देशनपत्र:
तालुका      एकूण अर्ज
तेल्हारा         226
अकोट           92
मूर्तिजापूर      103
अकोला        232
बाळापूर        136
बार्शीटाकळी    179
पातूर           103
——————
एकूण          1071
913 मतदान केंद्र:
जिल्ह्यात 225 ग्रामपंचायत निवडणुकीकरिता 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, 913 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये तेल्हारा येथे 189, अकोट येथे 131, मूर्तिजापूर येथे 114, अकोला येथे 167, बाळापूर येथे 154, बार्शीटाकळी येथे 102 आणि पातूर येथे 94 असे तालुकानिहाय मतदान केंद्र राहणार आहेत.

Previous articleखरोसा लेणी … !!
Next articleकोरोनाने मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबाला मिळणार आर्थिक मदत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here