व-हाड दूत न्युज नेटवर्क
देऊळगावराजा जि.बुलडाणा: संस्काराची शिकवण देणाºया राजमाता मॉं सोहब जिजाऊ यांच्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला कोरोना महामारीची किनार लागू नये व खबरदारीच्या उपाययोजना म्हणून या वेळेसचा जन्मोत्सव सोहळा हा येत्या 12 जानेवारीला आॅनलाईन पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याचे सूतोवाच जिजाऊ श्रृष्टीचे व्यवस्थापकिय अध्यक्ष सुभाष कोल्हे यांनी १४ डिसेंबर रोजी केले.
3 जानेवारी सावित्रीबाई फुले जन्मोत्सव, 12 जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव, 14 जानेवारी देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुनाराजा संत चोखा जन्मोत्सव असा हा पंधरवाडा उत्सव सोहळ्याचे कार्यक्रम प्रशासकीय आढावा आणि उत्सव समितीच्या उपाययोजना बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्हा पोलिस अधीक्षक व अतिरिक्त पोलीस अधीक्षक बीडचे सुपुत्र बजरंग बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली सिंदखेड राजा येथे जिजाऊ श्रुष्टीचे व्यवस्थापकीय अध्यक्ष सुभाष कोल्हे, राजे लखुजीराव जाधव वंशज शिवाजीराजे जाधव, अॅड. राजेंद्र ठोसरे, मोहनराव अरबट, किशोर भोसले, प्रदीप बिल्लोरे, महेश पवार, सागर खांडेभारड, ज्योतिताई जाधव, अॅड. उर्मीला हाडे, राजू मंडवाले, ओम खेडकर, प्रशासकीय अधिकारी तहसीलदार सावंत, पोलीस उपविभागीय अधिकारी सोनवणे, ठाणेदार सातव, मुख्यधिकारी न. प. सिंदखेड राजा, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे उपस्थित होते.
यावेळी या बैठकीत जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या आदेशाचे प्रसंगावधान राखल्या जाईल.
कोल्हे यांनी मराठा सेवा संघाचे सर्वोच्च असलेले शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या सूचनेनुसार 12 जानेवारी 2021 चा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आणि जिजाऊ श्रृष्टीवरील सर्व कार्यक्रम हे आॅनलाईन दाखविल्या जाईल. त्यामुळे घरीच मॉं साहेब जिजाऊंच्या संस्कृती प्रमाणेआप आपल्या घरी जिजाऊ पूजन करून दिवसभर जिजाऊ श्रुष्टीवरील आॅनलाईन
कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले.