शेतकऱ्यांचे अच्छे दिन केंव्हा येणार …

0
319

आज ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’
वर्षातील प्रत्येक दिवस शेतकरी दिवस असावा..

विशालराजे बोरे
व-हाड दूत विशेष

तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो,
सकळांचे लक्ष तुजकडे वळो!!
मानवतेचे तेज झळझळो !!!
या विश्वामाजी या योगे !!!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अखंड देशाची खळगी भरणाऱ्या बळीराजाच्या श्रमास प्रतिष्ठा मिळण्याचा आशावाद ग्रामगीतेतून व्यक्त केला आहे,आज २३ डिसेंबर म्हणजे ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ मुळात जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा हा वर्षाचे ३६५ दिवस शेतात राबतो तेंव्हा कुठे आम्हाला हक्काची भाकर मिळू शकते, देशातील शेतकऱ्यांनी काम बंद आंदोलन केले तर देशाला उपाशी राहावे लागेल अशी परिस्थिती आहे.शेतकरी दिन हा दरवर्षी भारतात २३ डिसेंबरला साजरा करण्यात येतो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा हा जन्मदिवस किसान दिन म्हणून साजरा केला जातो.

एकीकडे भारत देश महासत्तेचा आशावाद व्यक्त होत असताना दुसरीकडे मात्र शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटांनी हवालदिल झाला आहे.’राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होत असताना आज देशातील ‘शेतकरी दीन’ तर होत नाही ना याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.दिल्लीमध्ये अनेक दिवसांपासून पंजाब हरियाणासह देशभरातील शेतकऱ्यांनी शेती विधेयकाच्या विरुद्ध आंदोलन पुकारले आहे. आज बळीराजाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज पडत आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्याचा अधिक अंत पाहू नये हीच भावना समाज मनातून व्यक्त होत आहे.शेतकऱ्याला सन्मानाने बळीराजा म्हटले जाते; मात्र या राजाचा संकटांनी ‘बळी’जाऊ नये अशी व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे.प्रत्येक भारतीयाने समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्याप्रती किमान कृतज्ञतेची भावना ठेवणे अत्यावश्यक गरजेचे आहे.

मुळात शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे प्रत्येक दिवसाचा संघर्ष आहे.मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातील कपाशी मूग उडीद सोयाबीनसह सर्व पिके निघून गेली मात्र बळीराजा तरीही खचला नाही पुन्हा नवीन जोमाने देशाला समृद्धतेकडे नेऊ असा विचार मनात बाळगून अखंडपणे मेहनत करणाऱ्या बळीराजाच्या नशिबी यावर्षी सुद्धा काहीच आले नाही परतीच्या पावसामुळे जी स्वप्न शेतकऱ्यांनी पहिली होती ती पार धुळीस मिळाली मूग उडीद सोयाबीन या सर्व खरिपातील पिकांचे राज्यभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र तरीही बळीराजा खचला बळीराजा हरला तर हा देश कसा चालेल एवढीच एक चिंता त्याला आहे…

Previous articleहे लोक महर्षी युगपथदर्शी, विजयी नाम अनोखा
Next articleसेवा परमो धर्म.. संत गाडगेबाबांचा विचार आज जगभरात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here