व-हाड दूत विशेष
देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख
यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार विशाल राजे बोरे यांनी लिहलेला विशेष लेख.
डॉ पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांनी विदर्भातीलच मुलांना सहज शिक्षण मिळावे शिक्षण मिळावे म्हणून 1932 साली अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून खेड्या पाड्यात बहूजनांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.डॉ पंजाबराव देशमुख हे भारताचे पहिले कृषी मंत्री असतांना दिल्ली येथे जागतिक स्तरावर 92 दिवसाचे कृषी प्रदर्शन भरविले होते.या कालावधीत जगातील अनेक देशातील पंतप्रधान, राष्ट्रप्रमुखांनी या प्रदर्शनीला भेट देऊन डॉ पंजाबराव देशमुख यांचे कौतुक केलं होतं. डॉ पंजाबराव देशमुख हे संविधान सभेचे सदस्यही होते. भारतीय संविधान निर्मिती मध्ये सुद्धा त्यांचे योगदान आहे..
स्वातंत्र्यपुर्व काळात देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काम केल्यानंतर भारताचे पहिले कृषीमंत्री झाले ते म्हणजे पंजाबराव देशमुख. कृषीक्षेत्राची सर्वांगीन भरभराट त्यांच्या काळात झाली. पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डीसेंबर 1898 रोजी विदर्भातील पापळ सारख्या लहानशा गावी शेतकरी कुटुंबात झाला. शेतकरी कुटूबांतील जन्म, त्यामुळे पंजाबरावांना शेतीमधील खडानखडा माहीती होती. त्याचाच फायदा त्यांना त्यांच्या कृषीमंत्री पदाच्या कार्यकाळात झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण अमरावती मधील “पापळ” या लहानशा गावी झाले. त्यानंतर त्यांचे उच्यमाध्यमिक शिक्षण अमरावती मध्ये झाले. त्यांना पदवी मिळण्याआधीच परदेशात शिकण्याची संधी मिळाली. ही संधी त्यांनी सार्थकी लावत केंब्रिजमधुन आपली एम.ए. ची पदवी पुर्ण केली. नंतर त्यांनी संस्कृत व वैदिक वाङ्ममय या विषयामध्ये पीएचडी संपादन केली. त्यांनी भारतात परतल्यानंतर सक्रीय राजकारण व समाजकारणात पदार्पण केले.
हिंदू देवस्थान संपत्ती विधेयक
पंजाबरावांनी घटना समितीमध्ये असताना एका कायद्याची संकल्पना मांडली. त्या कायद्याप्रमाणे देशातील सर्व देवस्थानं केंद्राच्या व सरकारच्या अखत्यारीत घ्यावीत व देवस्थानातुन मिळणारा पैसा, दान म्हणून मिळालेली संपत्ती हि देशातील गरजू लोकांच्या हितासाठी वापरण्यात यावी.