बुलडाणा: शासकीय तंत्र कनिष्ठ महाविद्यालय, बुलडाणा येथे सत्र 2020 – 21 साठी इयत्ता 11 वी व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. येथे प्रवेशाची विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध झाली आहे. इयत्ता 10 वीत उत्तीर्ण किंवा एटीकेटी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. या महिावद्यालयात उच्च माधमिक अभ्यासक्रम एचएसची व्होकेशनल साठी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, मेकॅनीकल टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी हे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध असून प्रती अभ्यासक्रमाच्या 30 जागा आहेत. अधिक माहितीसाठी 9673488997, 9850318228, 9822716170, 8605735258 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र व कनिष्ठ महाविद्यालय, गणेश नगर, मलकापूर रोड, बुलडाणा या ठिकाणी संपर्क करावा. तरी विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश घ्यावे, असे आवाहन मुख्याध्यापक यांनी केले आहे.