वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा:आयुर्वेद महाविद्यालय बुलडाणा येथील कोविड सेंटर वर मनीषा कमलाकर खरात ह्या एप्रिल महिन्यापासून कोरोंना रुग्णांना सेवा देत आहेत. पोटात गर्भ वाढत असतांनाही मनीषाने रुग्णसेवेचा कंटाळा केला नाही की कधी सुट्टी घेतली नाही.
“काळजी घे” या सहानुभूतीच्या दोन शब्दांनी दिलासा देणार्या ३२ जणांच्या स्टाफने सातव्या महिन्याची चाहूल लागताच परिचारिका मनीषाचे डोहळ जेवनाचा कार्यक्रम आयोजित करून तिला सुखद धक्का दिला. पिपीई किट घातलेली मनीषा या सोहळ्याने भाराउन गेली.
गर्भवती असतांनाही कोविड रुग्णालयात सेवारत राहिलेल्या या कर्तव्यनिष्ठ परिचारिकेचे डोहळ जेवण आयोजित करून तिच्या सेवेचा सन्मान केला आहे.या अनोख्या कार्यक्रमाचे वैध्यकीय क्षेत्रात कौतुक होत आहे.