अकोला : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक 2020-21 घोषीत झाले असून ग्रामपंचायत निवडणुकीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज या कार्यालयास प्राप्त होत आहे. अर्ज स्विकृतीची शेवटची तारीख 30 डिसेंबर असल्याने जात पडताळणी कार्यालय शासकीय सुट्टीच्या दिवशी 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2020 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सुरु राहिल, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य यांनी केले आहे.