वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शेतक-याकडून 1 हजार रुपयाची लाच घेतांना अव्वल कारकूनास लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई 23 डिसेंबरराेजी संध्याकाळी करण्यात आली.
खामगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील शेतक-याचे जिगाव प्रकल्पाच्या क्षेत्रात शेत असून त्यापैकी 1.64 आर जिगाव प्रकल्पासाठी राखीव आहे. राखीव क्षेत्र गट नंबर 548 पोट खराब वगळता लागवड योग्य क्षेत्रातून त्यांच्या मुलाच्या नावावर जमीन बक्षीस पत्र करण्याची परवानगीचे काम करून देण्याकरिता अव्वल कारकूनाने 1 हजार रुपयाची शेतक-यास मागणी केली. शेतक-याने यासंदर्भात लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. जिल्हा पुनर्वसन अधिकारी बुलडाणा कार्यालयातील कांतीलाल मांगीलाल जाधव, वय 51 यास शेतक-याकडून लाच घेतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पाेलिस उपअधीक्षक रामकृष्ण मळघणे, पो.ना विलास साखरे, पो.ना.मो.रिजवान, पो.ना.रवींद्र दळवी, पो.ना.सुनिल राऊत, पो.काँ विजय मेहेत्रे, पो काँ रगड यांनी केली.