मराठा समाजाला EWS चा लाभ, शिक्षण-नोकरीत फायदा; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

0
346

एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश, व सेवाभरतीसाठी देणार
वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
मुंबई: आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी महाविकासआघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गाच्या (SEBC) आरक्षणपासून वंचित असलेल्या मराठा समाजाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मात्र, एसईबीसी आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मराठा आंदोलक हा पर्याय कितपत स्वीकारणार, हे पाहावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एसईबीसी प्रवर्ग EWS आरक्षणाच्या लाभांसाठी पात्र नाही. हा निर्णय घेऊन राज्य सरकारने मराठा आरक्षणावर गेम केली आहे. आमचा समाज SEBC असताना आम्हाला ओबीसीतून आरक्षण जाहीर करण्याऐवजी सरकारने EWS आरक्षण देऊन आपली सोय पाहिली आहे, अशी टीका मराठा नेते राजेंद्र कोंढरे यांनी केली.

Previous articleसावित्रीबाईंचा जन्मदिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा होणार
Next articleशेतक-याकडून हजाराची लाच, अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here