बुलडाणा: पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्तीचे काही विद्यार्थ्यांनी खाते पोस्ट ऑफीसमध्ये उघडले आहे. पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 3.7 लक्ष आहे. तरी अशा विद्यार्थ्यांनी डाक कार्यालयात येवून आयपीपीबी अर्थात इंडियाज पोस्ट पेमंट बँकेचे खाते आपल्या आधार क्रमांकाशी लिंक करावे. अशा विद्यार्थ्यांना याबाबत एसएमएससुद्धा पाठविण्यात आले आहे. त्यांनी आपल्या जवळच्या डाक कार्यालययात जावून आधार लिंक खाते काढून घ्यावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती जवळच्या डाक कार्यालयातच मिळेल. तरी विद्यार्थ्यांनी या सेवेचा लाभ घेवून इंडियाज पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडावे, असे आवाहन अधिक्षक डाकघर बुलडाणा विभाग यांनी केले आहे.