सावित्रीबाईंचा जन्मदिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा होणार

0
361

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क 
मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी  हा जन्मदिवस हा राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जाईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आज याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.
स्त्री शिक्षणातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या दिवशी शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे, निबंध, वक्तृत्व, परिसंवाद व एकांकिकांचे आयोजन करण्यात येईल. त्याचप्रमाणे, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांत, शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल. त्यांच्या नावाने स्त्री शिक्षणात कार्यरत शिक्षिका, अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या यांना पुरस्कार देण्यात येईल, ऑनलाईन तसेच ऑफलाईन चर्चासत्र आयोजित केले जातील आणि समाजमाध्यमांवर मीसावित्री, महिला शिक्षण दिन असे हॅशटॅग वापरून नव्या पिढीला यात सामावून घेतले जाईल. अशी माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.

Previous articleवीज कंपन्यांतील रिक्त पदे भरण्यासाठी वेगाने प्रक्रिया राबवा–उर्जामंत्री डॉ राऊत यांनी दिले निर्देश
Next articleमराठा समाजाला EWS चा लाभ, शिक्षण-नोकरीत फायदा; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here