वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
चिखली : येथील शासकीय रुग्णालयातील कर्मचा-यांकडून प्रसूतीनंतर बाळ सोपवण्यासाठी पैशाची मागणी केल्याची बाब समोर आली आहे . याचा व्हिडिओ रुग्णाच्या नातेवाईकांकडून व्हायरल झाल्याने बरीच चर्चा झाली. या प्रकरणाच्या तपासासाठी रुग्णालय प्रशासनाने पाच जणांची समिती नेमली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने देखील दखल घेऊन दोन लोकांची समिती तयार केली आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.जे.आर.मकानदार आणि प्रभारी
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सचिन कदम समितीमध्ये आहेत.
या संदर्भात बोलताना डॉ. मकानदार म्हणाले, ही घटना अत्यंत गंभीर आहे. तसेच प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि तीव्र गतीने करुन दोन दिवसांत अहवाल तयार करू.तसेच दोषींविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्या सोबतच भविष्यात असा प्रकार होणार नाही या बाबत सावधानी ठेवू.