बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 807 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 630 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 177 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 146 व रॅपिड टेस्टमधील 31 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 100 तर रॅपिड टेस्टमधील 530 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 630 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :
खामगांव शहर : 37, दे. राजा शहर : 2, दे. राजा तालुका : गारखेड 2, पिंपळगाव 1, दे. मही 5, अंढेरा 1, बुलडाणा शहर : 33, बुलडाणा तालुका : कोलवड 1, वाकडी 2, चांडोळ 1, डोमरुळ 1, खुपगाव 1, मासरुल 1, दुधा 1, मोहखेड 1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : दुधलगाव 2, शेलुद 1, मलकापूर शहर: 5, मलकापूर तालुका : कुंड बु 1, मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : डोनगाव 1, पिंप्री माळी 1, शेलगाव दे. 1, उकळी 1, सावत्रा 2, हिवरा गार्डी 4, घटबोरी 1, दे. साकर्षा 4, लोणार तालुका : जांभूळ 1, चिंचोली 1, नांदुरा शहर :1, नांदुरा तालुका: भुईशिंगा 1, जळगांव जामोद शहर : 9, जळगाव जामोद तालुका: खेर्डा 4, वाडी खुर्द 2, वाडशिंगी 10, पळशी घाट 1, मडाखेड 1, मोताळा तालुका : धामणगाव बढे 1, टाकळी 1, टाकरखेड 1, माकोडी 1, लोणार शहर :3, खामगाव तालुका: लाखनवाडा 1, टेंभुर्णा 1, सिंदखेड राजा शहर:1, मोताळा शहर: 2, संग्रामपुर तालुका: बोडखा 2, शेगाव शहर : 11, मुळ पत्ता टाकनघाट ता. पातुर जि. अकोला 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 177 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान सुंदरखेड, बुलडाणा येथील 54 वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 107 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :
दे. राजा तालुका : मेंडगाव 4, दे. मही 6, अंढेरा 1, उमरखेड 1, शेगांव शहर : 2, नांदुरा शहर : 5, खामगांव शहर : 10, चिखली शहर : 8, चिखली तालुका : धोत्रा 1, मेरा बु 1, एकलारा 1, सि. राजा तालुका : सवडत 6, झोंटिंगा 1, बरलींगा 9, वाघाळा 1, पिंपळगाव पुडे 1, बुलडाणा शहर : 7, नांदुरा तालुका : निमगाव 2, मेहकर शहर: 3, शेगाव तालुका : माटर गाव 3, मेहकर तालुका : डोन गाव 1, जळगाव जामोद शहर : 1, जळगाव जामोद तालुका : मडाखेड 2, खेरडा 1, दे. राजा शहर : 4, मलकापूर शहर :1, सिंदखेड राजा शहर :6, लोणार तालुका: सुलतानपूर 1, संग्रामपूर शहर :1, लोणार शहर :1, मोताळा तालुका : धा. बढे 5, तरोडा 1, बोराखेडी 2, पोफळी 1, शेलापूर 1, संग्रामपुर तालुका: पेसोडा 1, मूळ पत्ता दगड खेड ता बाळापुर 1, वडगाव ता. बाळापुर 1, हाता ता. बाळापुर 1, पारध ता भोकरदन जि जालना 1.
तसेच आजपर्यंत 23401 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 3642 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 3642 आहे.
आज रोजी 1569 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 23401 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 4951 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 3642 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1245 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 64 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.