वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
शेगाव : विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या संत नगरी शेगाव मध्ये श्री संत गजानन महाराज यांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून शेकडो भाविक दररोज येत असतात. श्रीच्या दर्शनासाठी येणारे हे भाविक कोरोंनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत असून श्रीच्या दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.
१६ नोव्हेंबर पासून संपूर्ण राज्यातील मंदिरे व धार्मिक स्थळे भाविकाना दर्शनासाठी खुली करण्याची घोषणा झाल्यानंतर शेगाव चे मंदिर देखील कोरोंनाच्या नियमांचे काटेकर पालन करीत भाविकांसाठी खुले करण्यात आले.त्यानंतर ई-पास घेऊन दररोज ८ हजार भाविक शिस्तबद्द रीतीने पहाटे ५ वाजल्यापासून तर रात्री ८वाजेपर्यंत श्रीचे दर्शन घेत आहेत.
सुरूवातीला काही दिवस बंद असलेली महाप्रसादाची व्यवस्था श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्थ कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी विश्वस्त नीलकंठदादा पाटील यांच्या देखरेखीखाली श्रीच्या दर्शनासाठी मंदिरात येणार्या भाविकाना महाप्रसाद सुद्धा वितरित करणे सुरू करण्यात आले आहे.