वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
जळगाव: ता.बोदवड येथील चीचखेड येथे राहणार शंकर गरबड लवंगे वय 72 वर्ष यास मूलगा ज्ञनेश्वर शंकर लवंगे याने डोक्यात तसेच चेहर्या वर जबर मारहाण करून गंभीर जखमी करून जिवानिशी ठार केले.
मूलगा ज्ञनेश्वर हा एका लग्नात गेला असता तिथे त्याच्या पत्नीला भेटल्याने शेतात येण्यास उशीर झाला या कारणावरून मृतक शंकर लवंगे व मूलगा ज्ञानेश्वर यांच्यात वाद झाला. यामध्ये वडिलांनी ज्ञनेश्वर ला मारहाण केली. मुलगा ज्ञांनेश्वर चा राग अनावर झाल्याने त्याने आपल्या वडिलांना काडीने जबर मारहाण करित जिवानिशी ठार केले.