वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
नवी दिल्लीः पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Scheme) योजनेंतर्गत कोट्यवधी शेतक-यांच्या बँक खात्यात 25 डिसेंबर रोजी आणखी एक हप्ता जमा केला जाणार आहे, अशी माहिती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. मध्य प्रदेशमधील रायसेनच्या संमेलनात मोदी बोलत होते. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. वर्षातून तीन वेळा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000-2000 रुपयांचे हप्ते पाठवले जातात. (Pm Kisan Scheme Pm Narendra Modi 2000 Rupees To Be Transfered On 25 Dec On Farmers Account) पीएम किसान सन्मान योजनेत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये हस्तांतरित करते.