वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
मलकापूर : येथील नांदुरा रस्त्यावरील १०० मिटर अंतराचा पॅच अपघाताला निमंत्रण देणारा ठरण्याची शक्यता आहे. पॅच वाचवण्यासाठी जडवाहनांची चढोओढ घातक अशीच असून सा.बा.विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मलकापूर नांदुरा रस्त्यावर जाधववाडी परिसरात मुख्य रस्त्यावर सुमारे १०० मीटर अंतरात पॅच पडले असून रस्त्याची एक बाजू खराब झाली आहे. त्यामुळे जडवाहनांची चांगल्या बाजूने रहदारीसाठी चढाओढ सुरू आहे. त्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा देखील समावेश आहे.गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता खराब जाधववाडी परिसरातील नागरीक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर रहदारी सुमार आहे. त्यात चांगल्या बाजूने वाहन काढण्यासाठी जडवाहनांची चढाओढ असते. त्यामुळे छोट्या वाहनांची चांगलीच पंचाईत होतांना दिसत आहे. परिणामी अपघाताची शक्यता आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांत तिव्र नाराजी व्यक्त होत आहे.