भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

0
334
वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू :राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार झाला ही घटना बुधवारी १६ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान घडली, ईश्र्वर जोशी असे मृतकाचे नाव आहे
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू कडून अकोला कडे जाणारा दुचाकीस्वार ईश्र्वर पंढरीनाथ जोशी वय ३० वर्ष रा गंगापुर जिल्हा जळगाव जामोद हे आपली दुचाकी क्रंमाक एम.एच.१९ डीसी ६५३३ ने जात होते दरम्यान अकोला कडून बोरगाव मंजू कडे जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक एम एच ४० बीएल ५२६३ जात होता दरम्यान सदर दुचाकीस्वाराला बोरगाव मंजू येथील शाॅ मिल जवळ जबर धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार ईश्वर जोशी गंभीर जखमी झाले, घटनेची माहिती मिळताच  ठाणेदार सुनील सोळंके सह पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक कानडे योगेश काटकर, शे. फईम शे. चाॅद, संजय इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर जखमीस शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाॅक्टरांनी  ईश्वर जोशी यास मृत घोषित केले .
Previous articleनिराधार व बेघर महिलांसाठी सुरक्षा गृह तयार करावे
Next articleराजर्षी शाहू फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; चिखलीत स्वयंस्फूर्तीने ९१ जणांनी केले रक्तदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here