वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
खामगाव: महिलांवर होणारे अत्त्याचार वाढत असल्याने अन्यायग्रस्त व पिडीत महिलाना सुरक्षा गृहाची गरज असून जिल्ह्यामध्ये महिला सुरक्षा गृह उपलब्ध नसल्यामुळे पीडितांना अकोला तसेच अन्य जिल्ह्यातील सुरक्षा गृहात पाठवण्यात येते.त्यामुळे या बाबींकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा एड्व्होकेट मीरा बावस्कर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे .