वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
नांदूरा. डीझेल , पेट्रोल व गॅस दरवाढी विरोधात विनापरवाना रास्तारोको आंदोलन करून प्रधानमंञी मा.नरेंद्र मोदी यांच्या प्रतीमेवर काळे आॅईल टाकून प्रतीमेची विटंबना करणाञ्या काॅंग्रेसच्या आंदोलन कर्त्यांवीरूध्द नांदूरा पोलीसांनी मंगळवारी राञी विविध गून्ह्यांची नोंद केली.
या बाबत सविस्तर व्रूत्त असे की मंगळवारी 15 डीसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता रेल्वे स्टेशन चौकात गॅस ,पेट्रोल व डीझल दरवाढी विरोधात काॅंग्रेसच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.आंदोलना दरम्यान आंदोलन कर्त्यांनी केंद्र सरकारचा नीषेध करीत प्रधानमंञी यांच्या प्रतीमेवर काळे आॅईल टाकून प्रतीमेची विटंबना केली. दरम्यान या आंदोलनानंतर खूपीया विभागाचे प्रमूख पो.हे.काॅ.दीलीपसींग राजपूत यांनी नांदूरा पो.स्टे ला तक्रार दीली.
आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून विनापरवाना आंदोलन करून जील्हाधीकारी यांच्या आदेशाचे ऊल्लंघन केल्याचे नमूद केल्याने या प्रकरणी काॅंगेसनेते हाजी मूजम्मील अलीखान, राजेश पोलाखरे ,रवि राणे यांच्यासह शहर काॅंग्रेसचे अध्यक्ष गौरव पाटील,नरेश शर्मा, विनल मीरगे, शेख वसीम शेख कादर , महेंद्र वानखडे, कीसन मानकर ,सूरेश सोनोने ,शूभम ढवळे व शेख हमीद अशा बारा जणांवीरूध्द कलम 143, 149,341 भादवी सह कलम 135 मूं.पो.अ.अन्वये गून्हे दाखल केले.