वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :शहरातील राजेश्वर नगरातील एका 24 वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज १५ डिसेंबर रोजी उघडकीस आली.
राजेश्वर नगर येथील अभिजीत गोपाळ कुलकर्णी वय 24 वर्षे असे मृतक युवकाचे नाव आहे. अभिजीत हा बीई मेरीट स्टुडन्ट स्पर्धापरीक्षेची तयारी करत होता. त्याने आपल्या राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. बीईच्या शिक्षण मेरिटमध्ये पूर्ण करून स्पर्धापरीक्षेची तयारी करणारा हा युवक डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या केल्याची चर्चा आहे. या घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच शहर पोलिसचे एपीआय अभिजित अहिरराव, रवी हजारे, खारडे यांनी पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले आहे.