वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा:शहरात मोठ्या प्रमाणात अवैध वरली-मटक्याचा व्यवसाय सुरु असून यात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. मोलमजुरी करणारे लोक वरली मटका खेळत असल्याने त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वरली चालक बेभान झालेले आहे.अशात पोलिसा कडून होणारी कार्रवाई निरर्थक ठरत आहे. पोलिसांची कारवाई फक्त मजूरावर होत असून वरली चालवणारे मोठे मासे मात्र मोकाटच आहेत. 10 डिसेंबर रोजी बुलडाणा शहरातील 2 ठिकाणी वरली मटका अड्डयावर कारवाई करण्यात आली आहे.
बुलडाणा शहरातील पाटबंधारे विभागात समोर अवैधरीत्या वरली सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुलडाणा एसीबीचे पथकाने धाड टाकून आरोपी वसंता सीताराम परहाड रा. जुनागाव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून नगदी 640 रुपये जप्त करण्यात आले. एलसीबीचे एएसआय प्रकाश राठोड यांच्या तक्रारीवर आरोपी विरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई बुलडाणा शहर पोलिस स्टेशनच्या डीबी पथकातील दत्तात्रय नागरे व संजय कायंदे यांनी केली असून आरोपी सय्यद अनीस सय्यद मुनाफ रा.जोहर नगर याच्याकडून नगदी 230 रुपये जप्त केले आहे. पोलीस कर्मचारी संदीप कायंदे यांच्या तक्रारीवर आरोपी विरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.