बुलडाणा : भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त माहिती नुसार बुलडाणा जिल्ह्यात १२ व १३ डिसेंबरला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तसेच १४ व १५ डिसेंबरला काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
वातावरणात बदल झाला आहे. राज्यात काही ठिकाणी आज पाऊस रिपरीपला. दरम्यान बुलडाणा जिल्हयात ढगाळ वातावरण आहे. येत्या ३ ते ४ दिवसात हलका, मध्यम व
मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची अधिक शक्यता जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणाचे कृषी हवामान तज्ञ मनेश यदुलवार यांनी वर्तविली आहे.यादरम्यान शेतकऱ्यांनी वेचणी करुन वाळविण्यासाठी ठेवलेला कापूस सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच ढगाळ वातावरण व उच्च आर्द्रतेमुळे शेतातील उभ्या पिकांवर कीड़/रोग प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शेतकऱ्यांनी पाऊस पडून गेल्यानंतर शिफारसीनुसार कीटकनाशकांची फवारणी करावी,मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची अधिक शक्यता असल्याने शेतकरी बंधूंनी स्वत:ची व पशुधनाची योग्यप्रकारे काळजी घ्यावी असे आवाहन मनेश यदुलवार यांनी केले आहे.