वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोट :आज १० डिसेंबर रोजी सकाळी मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या चौघांना भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा एस (एमएच २० डीइ ७४३३)क्रमांकाच्या वाहनाने चिरडल्याने एकाचा जागीच तर दोघांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची घटना अकोट शहरालगत अंजनगाव रोड वरील राष्ट्रीय महामार्गावर सकाळी सहा वाजता दरम्यान घडली .
यात सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेलेल्या एका इसमाचा चिरडल्याने जागीच मृत्यू झाला . हा अपघात इतका गंभीर होता की , ज्या वाहनामुळे अपघात घडला ते वाहन रस्त्याच्या कडेला पलटी होऊन पडले होते. या अपघातात उत्तम नाठे (रा. रामटेक पुरा, अकोट) यांचा जाग्यावरच मृत्यू, तर शालिग्राम राऊत, गजानन नेमाडे यांचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाल्याचे समजते, यातील अनंत बोरोडे हे गंभीर जखमी असून त्यांना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे,
नित्याने सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे चारही व्यक्ती आजही मॉर्निंग वॉकला गेले असता एका भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांना जबर धडक दिली या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अन्य मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी अकोट पोलीस स्टेशनला फोन करून या अपघाताची माहिती दिली अपघाताची माहिती मिळताच अकोट शहर पोलिस स्टेशन चे कर्मचारी तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार ज्ञानोबा फड पोलिस स्टेशनचे चे कर्मचारी घटनास्थळी पोहचले होते, यावेळी वाहन चालकाला अटक करण्यात आली असून एकाच वेळी चौघांना वाहनाने चिरडल्याच्या या घटनेने शहरात दुखवटा पसरला असून घटनेची माहिती मिळताच शहरातील नागरिकांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात मोठी गर्दी केली होती . अकोट अंजनगाव मार्ग नुकताच तयार झाला असून रोड लगत दाट लोकवस्ती असलेली नगरे व घरे आहेत. त्यामुळे नागरिक, वृद्ध याच महामार्गावर सकाळी फिरायसाठी जातात. गेल्या अनेक वर्षांपासून इथे लोक फिरायला जातात. मात्र, महामार्गावर मॉर्निंग वॉकला जाणं कुणाच्या जीवावर बेतू शकतं, याचा या लोकांनी कधी विचारही केला नसेल