खामगावः तालुक्यातील रोहणा येथील शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना ४ डिसेंबर रोजी पहाटे उघडकीस आली आहे.
रोहणा येथील शेतकरी रामदास जगदेव इंगळे वय ५५ यांच्याकडे विदर्भ कोकण ग्रामीण बँक, शाखा खामगावचे दीड लाख रुपये कर्ज आहे. तसेच शेतीतूनही पाहिजे तसे उत्पादन मिळत नाही. त्यामुळे रामदास इंगळे हे नेहमी बेचैन राहत होते. याच कारणामुळे त्यांनी शेतातील विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरीकांनी शेतात जावून विहिरीतील मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी ज्ञानदेव रामदास इंगळे यांनी खामगाव ग्रामीण पोस्टेला तक्रार दिली असून पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.